पंढरपूर सिंहगडमध्ये विशेष मुल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न
भाषेमुळे लॅडर डिझाइन, ॲटोमेशन आणि इतर प्रगत डिझाइन प्रक्रिया विद्याथ्यांना शिकता येतील

पंढरपूर/प्रतिनिधी : एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरच्या विदयुत अभियांत्रिकी विभागात ” लॅडर लॉजिक विथ पी. एल. सी. प्रोग्रामिंग” याविषयी विशेष मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. कोंडूरू शिवशंकर, इतर प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रातील प्रशिक्षक अविनाश खंडागळे या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना लॅडर लॉजिक विथ पी.एल.सी. प्रोग्रॅमिंग याविषयी विशेष ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळाली.
विभाग प्रमुख डॉ. कोंडूरू शिवशंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत लॅडर लॉजिक विथ पी. एल. सी. प्रोग्रामिंग चे औद्योगिक विकास क्षेत्रातील महत्त्व पटवून दिले. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डी.एम. कोरके यांनी पी. एल. सी. प्रोग्रॅमिंग या भाषेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, या भाषेमुळे लॅडर डिझाइन, ॲटोमेशन आणि इतर प्रगत डिझाइन प्रक्रिया विद्याथ्यांना शिकता येतील, ज्यामुळे त्यांचे औद्योगिक क्षेत्रातील कौशल्य व कार्यक्षमता वाढेल.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत असे कार्यक्रम केवळ तांत्रिक ज्ञान विकसित करण्यापुरते मर्यादित नसून, ते विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक यशासाठी मार्गदर्शक ठरतात. असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा पूर्ण लाभघेण्याचे आवाहन केले.
लॅडर लॉजिक विथ पी. एल. सी. प्रोग्रामिंग या कोर्समध्ये पी. एल. सी. सॉफ्टवेअरच्या विविध उपयोजनांवर विशेष भर दिला. यात लॅडर लॉजिक भाषेचा परिचय, पी. एल. सी. प्रोग्रॅमिंगची संकल्पना, उद्योगाभिमुख पी. एल. सी. प्रोग्रॅमिंग आणि प्रात्यक्षिकांचा समावेश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन आणि लेडर लॉजिक डिझाइनच्या व्यावसायिक गरजांमध्ये जास्त चांगल्या प्रकारे काम करता येईल.
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा संपूर्ण लाभ घेतला असून,आपले औद्योगिक क्षेत्रातील कौशल्य प्रगल्भ करण्याचा निर्धार केला आहे. पी. एल. सी. प्रोग्रॅमिंगमुळे औद्योगिक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी त्यांना निश्चितच स्पर्धात्मक स्थान निर्माण करून देईल.
महाविद्यालयाने असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. ज्यामुळे विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत राहतील आणि जागतिक औद्योगिक आणि आयटी तंत्रज्ञान गरजांशी जोडले जातील. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख,डॉ. कोंडूरू शिवशंकर, व्ही. पी. मोरे, डी.एम.कोरके, सोनाली घोडके , ए. एन. गोडसे ,तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.