शैक्षणिकमहाराष्ट्र

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये कार्यशाळा संपन्न

MATLAB वापरून कंट्रोल सिस्टीमच्या व्यावहारिक अंमलबजावणीचे प्रशिक्षण


पंढरपूर/हेमा हिरासकर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग ,  इनोव्हेशन क्लब, विदयुत अभियांत्रिकी यांच्या संयुक्त विद्यमाने “Control System Engineering Simplified To Everyone”  या विषयावर कार्यशाळेचे  आयोजन दिनांक 7 मार्च 2025 रोजी द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व तृतीय वर्ष विदयुत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची इस्त्रो, हैद्राबाद येथे औद्योगिक भेट

या कार्यशाळेसाठी प्रमुख प्रशिक्षक डॉ. व्ही. एस. बिरादार, सहयोगी प्राध्यापक, एन. बी. एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर यांचे डॉ. शिवशंकर कोंडूरू यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षक डॉ. व्ही. एस. बिरादार यांनी कंट्रोल सिस्टम इंजीनियरिंग ची प्राथमिक माहिती देण्यात आली.  या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना कंट्रोल सिस्टीम इंजिनिअरिंगमधील मूलभूत संकल्पना व त्यांचा  MATLAB वापरून प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी हे शिकवण्यात आले.  MATLAB च्या मदतीने सिम्युलेशन, मॉडेलिंग व विश्लेषण कसे करावे, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.सदरील कार्यक्रमाचे नियोजन सौ. अंजली चांदणे व सौ. अंजली पिसे यांनी केले होते. या कार्यक्रमात  १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. शिवशंकर कोंडूरू यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना मिळालेले ज्ञान त्यांच्या भविष्यात उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. कोंडूरू व्यक्त केला.सदरील कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग ,  विदयुत अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button