
इन पब्लिक न्यूज ऑनलाईन : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक टॉप अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक धाडसी आणि इंटिमेट सीन दिले आहेत. आज आपण अशीच एक अभिनेत्री आहे जिने एका सिनेमात किसिंग सीन दिला होता आणि त्यामुळे तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रेक्षक या सीनमुळे हैराण झाले आणि थिएटरमध्ये चांगलीच चर्चा रंगली.
ऐश्वर्याचा पहिला किसिंग सीन
धूम 2 चित्रपटाच्या आधी ऐश्वर्याने कधीच कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन केला नव्हता. ती अशा प्रकारच्या सीनसाठी तयार नसायची. मात्र, ‘धूम 2’ या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये आणि गरज असल्यामुळे, तिने तिची पूर्वीची भूमिका बाजूला ठेवून हा सीन केला.
सीननंतर माजला गोंधळ
ऋतिक आणि ऐश्वर्याचा हा सीन इतका चर्चेत आला की, चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी गोंधळ घातला. काहींनी संताप व्यक्त करत कायदेशीर नोटिसेस पाठवल्या. ऐश्वर्याने नंतर एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
कायदेशीर नोटिसेमध्ये काय लिहिलं होतं?
एका नोटिसमध्ये लिहिलं होतं: “तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात, तुम्ही मुलींसाठी एक प्रेरणा आहात. जर तुम्हाला असं करायला स्क्रीनवर गैरसोयीचं वाटत असेल, तर मग तुम्ही हे का केलं?”
तरीही ‘धूम 2’ ठरला ब्लॉकबस्टर
सर्व वादांनंतरही ‘धूम 2’ हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ऐश्वर्या राय आणि ऋतिक रोशन यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि चित्रपटाने जबरदस्त यश कमावलं.