पैशाच्या वादातून तिघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला; तीन गंभीर जखमी

पुणे / प्रतिनिधी – उरुळी कांचन परिसरात पहाटे एका टोळक्याने पैशाच्या वादातून तिघा युवकांवर धारदार हत्यारांनी हल्ला करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवकामुळे झाला वाद
फिर्यादी युवकाचा मित्र वय १६, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो आणि त्याचे तीन मित्र पहाटे १ वाजता पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका परिसरात इराणी चहाच्या हॉटेलजवळ थांबले होते. यावेळी हल्ला करणाऱ्याने तो युवक कुठे आहे त्याच्याकडे माझे पैसे आहेत,” अशी विचारणा केली.
बोलण्यावरून थेट हल्ला
ही विचारणा टोळक्याच्या मनाला न रुचल्याने त्यांनी “युवक विचारणा करणारा कोण?” असे विचारतच शिवीगाळ सुरू केली. काही वेळातच त्यांनी आणखी तीन साथीदारांना बोलावले आणि हॉकी स्टिक व धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला.
डोक्यावर वार; तिघे गंभीर जखमी
या हल्ल्यात आरोपीने युवकाचा डोक्यावर धारदार हत्याराने वार केला. त्याचप्रमाणे युकाचा मित्रान वर हॉकी स्टिक व धारदार हत्यारांनी हल्ला करून गंभीर जखमी करण्यात केले.
गुन्हा दाखल; तपास सुरू
या प्रकरणी युवकाचे पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण व इतर पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न, हल्ला, आणि गुन्हेगारी टोळी तयार करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.