Acharya Chanakya
इन पब्लिक न्यूज/विशेष रिपोर्ट : नवीन वर्ष सुरु होऊन आता पाच महिने उलटले. या काळात देश-विदेशात युद्ध, भूकंप, आर्थिक मंदी यांसारख्या घडामोडी घडल्या. अशा अस्थिर काळात स्वतःकडे पाहणे, आपली क्षमता ओळखणे आणि योग्य मार्गाने पुढे जाणे फार गरजेचे आहे.
यश मिळवण्यासाठी प्रेरणा कुठून घ्यावी, हे ठरवताना भारतीय इतिहासातील महान राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचे विचार खूप उपयोगी ठरू शकतात. चाणक्यांनी ‘नीतिशास्त्र’मध्ये सांगितलेल्या 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या, तर यश तुमच्या पायाशी लोळण घेताना दिसेल.
1. पैसा – वाचवा, उधळू नका
चाणक्य म्हणतात, “पैसा ही संकटकाळातली खरी साथ असते.”
विनाकारण खर्च केल्यास तुम्हाला गरजेच्या वेळी आधार मिळणार नाही. पैसा केवळ श्रीमंतीचे प्रतीक नाही, तर संकटातून बाहेर पडण्यासाठी लागणारे साधन आहे. म्हणूनच पैशाचे व्यवस्थापन शिका.
2. वेळ – हीच सर्वात मोठी गुंतवणूक
“वेळ कोणासाठीही थांबत नाही, पण ती वापरायला शिकला तर यश थांबतं तुमच्यासाठी.”
आचार्य चाणक्य वेळेचं महत्त्व अधोरेखित करतात. प्रत्येक क्षण काही ना काही शिकवतो. जो व्यक्ती वेळेचा आदर करतो, तोच यशाकडे वेगाने वाटचाल करतो.
3. निंदा – टाळा, दुर्लक्ष करा
चाणक्य सांगतात, “निंदा करणं म्हणजे स्वतःच्या ऊर्जा आणि वेळेचा अपव्यय.”
दुसऱ्यांवर टीका करणे, मत्सर करणे हे तुमचं मन नकारात्मकतेने भरून टाकते. त्यामुळे यशाचा मार्ग कठीण होतो. निंदा टाळा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा.
“संयम, शिस्त आणि स्वविवेक हाच यशाचा खरा मंत्र आहे.”
आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या मार्गदर्शक तत्वांवर जर तुम्ही विश्वास ठेवला आणि अमलात आणलं, तर कोणतीही अडचण तुमचं यश थांबवू शकणार नाही.
