महाराष्ट्र

कोल्हापुरातील मेंढर चारणारा ‘IPS’; बिरदेव डोणे यांचा UPSC परीक्षेत ५५१ वा क्रमांक


कोल्हापूर/प्रतिनिधी:  ज्याचं बालपण मेंढपाळीमध्ये गेलं, शिक्षणासाठी घरात जागा नव्हती, अभ्यास व्हरांड्यात होत होता. त्या कोल्हापुरातील यमगे गावच्या बिरदेव सिद्दाप्पा डोणे याने UPSC परीक्षेत 551वा क्रमांक मिळवत ‘IPS अधिकारी’ होण्याचं स्वप्न साकार केलं आहे.

यूपीएससीचा निकाल लागला, त्यावेळी बिरदेव मेंढर चारण्यासाठी गेला होता. या क्षणाचा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. कारण या यशामागे संघर्ष, सातत्य आणि जिद्द दडलेली आहे.

मेंढपाळाचं स्वप्न – व्हायचं होतं आयपीएस

बिरदेवचा जन्म आणि बालपण मेंढपाळाच्या कुटुंबात गेले. शिक्षणासाठी कोणतीही सोय नव्हती. त्यामुळे त्याने गावातील मराठी शाळेच्या व्हरांड्यात अभ्यास सुरू केला. दहावीत 96% गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिला आला आणि तिथेच सांगितलं – “मी आयपीएस होणार!”

तेव्हा हा निर्धार गावकऱ्यांसाठी आश्चर्य होता, पण बिरदेवने मात्र कधी हार मानली नाही.

COEP मधून इंजिनीअरिंग, मग UPSC

बारावीत 89% गुण मिळवून पुण्याच्या नामवंत COEP कॉलेजमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर UPSC च्या तयारीसाठी पुण्यातच राहून तीन वर्षे अविरत मेहनत केली.

पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आलं, पण तिसऱ्या प्रयत्नात बिरदेवने देशात 551वा क्रमांक पटकावत यशस्वी ‘आयपीएस’ होण्याचा मान मिळवला.

“यशाच्या वेळी फेटा वडिलांनी बांधला”

बिरदेवच्या आयपीएस होण्याच्या बातमीनंतर गावात आनंदाचा जल्लोष आहे. त्याचे वडील, जे अजूनही मेंढपाळी करतात, त्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर फेटा बांधत कौतुक केलं.

“संघर्ष करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी”

मेंढपाळीच्या पार्श्वभूमीवरून आलेल्या बिरदेवने यशाची जी गाथा रचली आहे, ती देशभरातील ग्रामीण, गरीब आणि सामान्य तरुणांसाठी दीपस्तंभ ठरू शकते.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button