महाराष्ट्र

धक्कादायक! भरदिवसा 40 तोळे सोन्याची बॅग हिसकावली; ‘धूम’ स्टाईल चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद


सांगली/प्रतिनिधी:   सांगलीतील कर्मवीर चौकात विवाहासाठी सोने आणणाऱ्या व्यापाऱ्याच्या हातातून बॅग हिसकावली. भरदिवसा ‘धूम’ स्टाईलने 40 तोळे सोन्याची बॅग हिसकावून चोरट्याने पोबारा केल्याची थरारक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून, शहरात खळबळ उडाली आहे.

विवाहकार्यक्रमासाठी लॉकरमधून काढलेले होते दागिने

स्थानिक व्यापाऱ्याच्या घरी नुकताच लग्नसोहळा पार पडला. त्यासाठी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेच्या लॉकरमधून 40 तोळे सोने बाहेर काढले होते. दोन दिवसांनंतर पुन्हा तेच दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी आज सकाळी साडे दहाच्या सुमारास पतसंस्थेमध्ये आले होते.

गाडीच्या दरवाजातून उतरताच बॅग हिसकावली

सगळे हे कारमधून उतरतात न उतरतात तोच आधीपासून पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याची बॅग जबरदस्तीने हिसकावली आणि काही क्षणांतच गर्दीत गायब झाला. त्यांनी आरडाओरड केली असली, तरी चोरट्याने तेव्हा पर्यंत पोबारा केला होता.

सीसीटीव्हीत कैद झाला धूम स्टाईलचोरीचा क्षण

हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे कैद झाला असून, पोलीस त्याचा अभ्यास करत आहेत. चोरट्याने चोरीपूर्वी बारीक निरीक्षण केल्याचे आणि माहितीगार व्यक्तीकडूनच ही माहिती मिळाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button