सांगोला

सांगोल्याजवळ भीषण अपघात : दोन मजूर ठार, नऊ जखमी


सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला-मिरज रोडवर बुधवारी रात्री ९:३० वाजता भीषण अपघात झाला. डाळिंब वाहतूक करणारी पिकअप जीप आणि ऊसतोड मजुरांनी भरलेला टेम्पो यांच्यात झालेल्या या धडकेत दोन मजूर ठार झाले, तर नऊजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात दोघांचा मृत्यू, नऊ जखमी

या अपघातात बाबूराव महादेव गोडसे (४२) आणि एकनाथ सोपान गडदे (५३), दोघेही रा. गौडवाडी, ता. सांगोला यांचा मृत्यू झाला. तर, सुजाता बापू आलदर (३५), रेश्मा संजय ऐवळे (३०), विमल भारत कांबळे (५५), दामू राजाराम शिंगाडे (६०), मैनुहुद्दीन गुलाब मुलानी (७०), गोरख लिंगू सरगर, हर्षद हनुमंत काटे (१८), हनुमंत श्रीरंग काटे (७०), भारत विष्णू कांबळे (६५), गणपत दत्तू आलदर (५०) हे जखमी झाले आहेत.

गौडवाडी (ता. सांगोला) येथील ऊसतोडणी कामगार एमएच-१०, के-६७५३ या टेम्पोमधून जात होते. त्याचवेळी, पिकअप (एमएच-४५, एएफ-६७८५) मध्ये डाळिंब भरून निघाली होती. सांगोल्यापासून एक किलोमीटर अंतरावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

धडक एवढी भीषण होती की, टेम्पो रस्त्याच्या बाजूला उलटला आणि त्यातील ११ कामगार ऊसाच्या वाड्याखाली अडकले. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button