फॅशन आयकॉन तमन्ना भाटिया पुन्हा चर्चेत, स्टनिंग ब्लॅक लूकची सर्वत्र चर्चा

मुंबई / प्रतिनिधी: अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा ग्लॅमरस अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनयात तिचं वर्चस्व सिद्ध झालेलं असतानाच, तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्सनेही चाहते धुरळा घालतात. सध्या तमन्नाने सोशल मीडियावर शेअर केलेला तिचा एक ब्लॅक स्लिमफिट ड्रेसमधील लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ग्रेसफुल अंदाजात कर्वी फिगर फ्लॉन्ट तमन्ना हिने परिधान केलेला ब्लॅक स्लिमफिट ड्रेस तिच्या कर्वी फिगरवर परिपूर्ण शोभून दिसतो आहे.

तिच्या या लूकमध्ये ती कमालीची आत्मविश्वासपूर्ण आणि ग्रेसफुल वाटते. तीने सटल शायनी बेस, स्मोकी आयज, रोजी शिमरी चीकस आणि ब्राऊन बोल्ड लिप्ससह मेकअप पूर्ण केला आहे.

रेट्रो हेअरस्टाईल ठरली खास आकर्षणतमन्नाच्या केसांची रेट्रो टच असलेली हेअरस्टाईल तिच्या संपूर्ण लूकला एक खास आकर्षण देत आहे.

डायमंड ईअररिंग्सची सोबत तिच्या स्टाईलला अधिक गोडवा आणते. चाहत्यांनी तिच्या या लूकवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

वर्क फ्रंटवर व्यस्त तमन्नाकामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर तमन्ना लवकरच ‘सिकंदर का मुकदर’, तेलुगू चित्रपट ‘ओडेला 2’ आणि वेब सिरीज ‘डार्लिंग पार्टनर्स’ मध्ये झळकणार आहे.तिच्या या प्रोजेक्ट्ससाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
