अवैध रेती तस्करीने घेतला बळी! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह?

विशेष प्रतिनिधी : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनाने घेतलेला बळी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे २२ वर्षीय निलेश दांडगे या युवकाचा अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकीवरून घरी जात असताना अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश अनिल दांडगे हा युवक जळगाव येथून आपले काम आटोपून दुचाकीने घरी परतत होता. रात्री सुमारे १०.१५ वाजताच्या सुमारास टाकळी खाती फाट्याजवळ भरधाव वेगात येणाऱ्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या अज्ञात टिप्परने त्याला जबर धडक दिली. या भीषण धडकेत निलेशचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सदर वाहन घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणी मृतकाचा भाऊ यांनी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंदवला आहे. सदर वाहन टिप्पर नव्हे तर आयशर असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या संदर्भात पोलीस तपास करत आहेत.
अवैध रेती तस्करीची भीषण संकट
या दुर्घटनेमुळे अवैध रेती तस्करीमुळे वाहतुकीवर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. याआधीही अनेक निष्पाप नागरिकांनी अशा भरधाव अवैध वाहतुकीच्या वाहनांमुळे जीव गमावले आहेत.