महाराष्ट्रशैक्षणिकसांगोला

डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात प्राध्यापक-विद्यार्थ्यांच्यात राडा?  

प्राध्यापक विद्यार्थी आमने-सामने, प्राध्यापकाने थेट बेल्टने विद्यार्थ्यांना मारले?


सांगोला/विशेष प्रतिनिधी : डॉ. गपतराव देशमुख महाविद्यालयात दोन दिवसापासून सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. दरम्यान दि.१८ मार्च रोजी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा विद्यार्थी आनंद घेत असताना एका अतीशहाण्या प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना रोखले त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात हमरे-तुमरे झाली. हा वाद चिघळला गेला. यानंतर विद्यार्थी प्राध्यापक आमने-सामने आले आणि प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना थेट बेल्टनेच मारहाण केली. यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले होते परंतु विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य, गैरवर्तन घडलेले नाही, असा दावा विद्यार्थी करत आहेत.

प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या मंडपामध्ये थेट बेल्टनेच मारले, विद्यार्थी म्हणाले…

इन पब्लिक न्यूजशी बोलताना विद्यार्थी म्हणाले, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आम्ही आनंद लुटत होते. यावेळी संयोजकांनी विद्यार्थ्यांसाठी गाणी लावली होती. विद्यार्थी डान्स करत या कार्यक्रमाचा आनंद घेत होते. हे करण्यास एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना मनाई केली. यानंतर सर्वामध्ये हमरे-तुमरे सुरू झाली आणि वाद चिघळला यानंतर प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या मंडपामध्ये थेट बेल्टनेच मारले.  

पुढे बोलताना विद्यार्थी म्हणाले, या प्रकारानंतर विद्यार्थी देखील आक्रमक झाले होते. परंतु विद्यार्थ्यांनी संयमाची भूमिका घेतली. सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन आम्ही न्याय मागितला आहे, असे विद्यार्थी म्हणाले.  

विद्यार्थ्यांनी केल्या “या” मागण्या…

  • प्राध्यापकाला  तात्काळ बडतर्फ करावे
  • बेल्टने विद्यार्थ्यांना का मारावे?
  • विद्यार्थ्यांची खरंच काही चूक होती का याची खातरजमा का केली नाही ?
  • नाहक पद्धतीने विद्यार्थ्यांना का मारले ?
  • जिमखाना डे व पारितोषिक वितरण हा विद्यार्थ्यांना वर्षातून २ ते ३ दिवस आनंद साजरा करण्यासाठी असतो मग या आनंदात विरजण टाकून बेल्टने मारणे योग्य आहे का ?
  • प्राध्यापकाने सर्वांसमोर मारले आहे तर तिथे माफी मागावी.
  • दि.१९ मार्चचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जेथे मारहाण केली तेथेच प्राध्यापकाने माफी मागावी, अश्या विविध मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांना न्याय देणार : डॉ. निकिताताई देशमुख

विद्यार्थी म्हणाले, आम्ही झालेल्या प्रकारानंतर थेट सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी गेले होतो. परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. यावेळी शेकापच्या युवा नेत्या डॉ. निकिताताई देशमुख यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देऊ अशी ग्वाही दिली आहे.  

मारहाण करणाऱ्या प्राध्यापकाला तात्काळ बडतर्फ करावे : पालकांनी केली मागणी

विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम हा आनंद घेण्यासाठी असतो. वर्षभरातून २-३ दिवस विद्यार्थ्यांना हा आनंद घेण्याची संधी मिळते. वर्षभर आमचे विद्यार्थी अभ्यास, परीक्षा, प्रॅक्टिकल व करिअरच्या बाबत चिंतेत असतात. या मिळालेल्या २ ते ३ दिवसात अशा प्रकारे प्राध्यापकांनी त्यांच्या आनंदात विरजण टाकण्याचे काम कितपत योग्य आहे? तसेच विद्यार्थ्यांना नाहक पद्धतीने बेल्टने मारले अशा प्राध्यापकाला  तात्काळ बडतर्फ करावे, तसेच न्याय मिळाला नाही तर आंदोलन करू असा इशारा पालकांनी दिला आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button