देश- विदेशशैक्षणिकसांगोला

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना,वेळेचा सदुपयोग हीच यशाची खात्री :  मयुरेश कोळेकर


सांगोला/प्रीतीनिधी : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस अंतर्गत, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च महाविद्यालयामधील सिव्हील इंजिनिअरिंग विभाग आयोजित “नगररचना विभागातील अभ्यासक्रम आणि परीक्षा” हे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते ,अशी माहिती सिव्हील इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा.शिवानंद माळी यांनी दिली.

या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मयुरेश कोळेकर (सहाय्यक,नगरनियोजक / नगररचनाविभाग,महाराष्ट्र शासन) हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोळेकर म्हणाले कि, “ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना,वेळेचा सदुपयोग हीच यशाची खात्री आहे” त्यासाठी परीक्षेच्या अभ्यासाचे  उत्तम नियोजन व त्यासाठी असणारा दिनक्रम कसा असावा. नगररचना विभाग व त्यांचे कार्य ह्याचाही माहिती त्यांनी यावेळी दिली. ह्या सत्रामध्ये शेवटी विद्यार्थ्यांनी,पडलेले प्रश्न विचारून सकारात्मक उत्तरे मिळवली.

हे व्याख्यान फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष मा. भाऊसाहेब रुपनर, सचिव डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे यांच्या मागर्दर्शनाखाली व व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, उपप्राचार्य डॉ विद्याराणी क्षीरसागर ,डीन ॲकॅडमिक डॉ.शरद पवार, डीन स्टुडंट डॉ.संजय पवार, सिव्हील इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा.शिवानंद माळी, स्पर्धा परीक्षासिव्हील इंजिनिअरिंगचे विभागाचे समन्वयक प्रा.अमोल मेटकरी,प्रा. शरद आदलिंगे प्रा.विशाल भाकरे तसेच सिव्हील इंजिनिअरिंगचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button