शैक्षणिक

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये AMPERE-X 2K25 या तांत्रिक कार्यक्रमातून  विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला मिळाले नवे पंख!


कोर्टी/पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोर्टी येथील इलेक्ट्रिकल Students’ Association) आणि IIC (Institute Innovation Cell)  तर्फे आयोजित AMPERE-X2K25 हा भव्य तांत्रिक कार्यक्रम उत्साहात पार पडला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. एस.जी. कुलकर्णी, आणि विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देणे तसेच त्यांच्यातील नेतृत्वगुण, संघटन क्षमता आणि सांघिक भावना वाढवणे हा होता. AMPERE-X 2K25 मध्ये विविध स्पर्धा, कार्यशाळा व सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले होते. विद्दुत अभियांत्रिकी विभागाच्या EESA व IIC तर्फे आयोजित केलेल्या AMPERE-X 2K25 या तांत्रिक महोत्सवात विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कलागुण आणि नेतृत्वगुणांची चमकदार झलक पाहायला मिळाली !

कार्यक्रमाचे नावे, विजेते व उपविजेते

Idea Presentation (२३) विजेता : कुलदीप गोडसे व आदेश कुलकर्णी,

उपविजेता : गणेश ढांगेकर व अंकित कुमार

Techno-Voice (४३) विजेता : गणेश ढांगेकर उपविजेता : अर्जुन नायकु

Mobile Games (58+) Free Fire : विजेता : श्रेयस मोरे , शुभम कदम , रोहित पाटील , प्रणव चव्हाण. उपविजेता : डांगे ऋतिक , विनायक भूनवासे , प्रथमेश किणकर, रोहित राऊत BGMI : विजेता : सिद्धिक मुजावर , प्रथमेश जाधव,अश्रफ जाधव, ताहीर मुलांनी. उपविजेता : स्वप्नील शिंदे , कौस्तुक पांगुरकर , यश अभंगराव.

Puzzle Board(76) विजेता : सागर शिंगाडे उपविजेता : सृष्टी पाटील

प्राचार्य डॉ. के. जे. करांडे म्हणाले: “विद्यार्थ्यांना नवकल्पना मांडण्याची आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याची ही उत्तम संधी आहे. अशा उपक्रमांमुळे केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर आत्मविश्वास, सृजनशीलता आणि संघभावनाही वाढीस लागतात.” तसेच उपप्राचार्य यांनी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) व AMPERE-X2K25 बद्दलचे महत्व सांगितले. त्यानंतर प्राध्यापक विनोद मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने म्हणजे २०० हून अधिक विद्याथ्यांनी सहभाग घेतला. नाविन्यपूर्ण कल्पना, वक्तृत्व कौशल्य आणि गेमिंगमधील उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळाला. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवून दिले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक अनुभव ठरला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना जाधव आणि निकीता माळी यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केले. त्यांच्या उत्साही सादरीकरणाने संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळाच जोश निर्माण झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी EESA टीम, मार्गदर्शक प्रा. प्रदीप व्यवहारे,  प्रा. सौ. अंजली  चांदणे आणि विद्यार्थी समन्वयक यश पवार, सरस्वती लेंगारे यांचे विशेष योगदान होते.

कार्यक्रम यशस्वी होणेसाठी विद्दुत अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button