महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये हवामानाचा तडाखा, IMD दिला इशारा

इन पब्लिक न्यूज/विशेष वृत्त : महाराष्ट्रासह भारतातील १४ राज्यांमध्ये हवामानाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या संदर्भात इशारा दिला आहे. अनेक राज्यांमध्ये वादळ, पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसणार आहे. पूर्व बांगलादेशवर चक्राकार वारे आहेत. यामुळे अनेक राज्यांमध्ये हवामानात अचानक बदल होणार आहे.
उष्णतेची लाट, वादळ, गारपीट आणि पाऊस
महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. महाराष्ट्रातील ब्रह्मपुरीत हंगामातील सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांसाठी अति उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.
Petrol-Diesel Price : होळीला सामान्य जनतेला मोठा दिलासा, “या” भागात झाले स्वस्त
हवामान खात्याचा इशारा
हवामान खात्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा तापमानाचा इशारा दिला आहे. गेल्या तीन दिवसांत चंद्रपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. होळीनंतर तापमानात झालेली वाढ नागरिकांसाठी चिंताजनक आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्या, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.