सिंहगड महाविद्यालयाची स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीस भेट

पंढरपूर : एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय येथील तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि. ९\४\२०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या बांधकामास अभ्यास भेट दिली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील स्थापत्य अभियांत्रिकी मधील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काँक्रिट कॉलम फुटींग बद्दलचे डिझाईन प्रात्यक्षिकाद्वारे समजण्यासाठी पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीस “स्टडी व्हीजीट” आयोजित केली होती. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी डिझाईन प्रमाणे सळई कशी बांधली जाते व लाईनआऊट वेळी कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत याची माहिती प्रा. गणेश लकडे यांनी दिली.
या स्टडी व्हीजीटसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार अभियंता श्री भारत ढोबळे यांची मोलाची मदत व मार्गदर्शन झाले.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ स्वानंद कुलकर्णी, संशोधन आणि विकास अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे व विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही इमारत बांधकाम भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. गणेश लकडे, प्रा. सिद्धेश पवार, प्रा. ओंकार बिडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वीपणे पार पडण्याकरिता विभागातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.