“अहो, जरा ऐकता का! आमचं आयुष्य तुमच्या आडमुठेपणामुळे वेठीस धरून नुकसान करता काय?” : असा संतापजनक सवाल विद्यार्थ्यांनी सोलापूर विद्यापीठ प्रशासनाला थेट केला
विशेष प्रतिनिधी : पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचा 21 वा उन्मेश सृजनरंगाचा युवा महोत्सव ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान सांगोला महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. परंतु विद्यापीठाकडून याच यजमान सांगोला महाविद्यालयातील 18 विद्यार्थ्यांना नियमबाह्यत दाखवून त्यांचे तब्बल चार वर्षाचे नुकसान हे विद्यापीठातील प्रशासनाकडून केले जात असल्याचा आरोप केल्याची माहिती देण्यात आली.
याबाबत इन पब्लिक न्यूजने विद्यापीठ प्रशासनाला माहिती विचारली असता यांच्याकडे कोणतीही माहिती नाही अशी प्रशासनाने सांगितले. परंतु महाविद्यालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी पत्रव्यवहार केल्याचे दस्तऐवज मिळून आले.
तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा संघर्ष :
विद्यार्थी गेल्या तीन महिन्यांपासून न्यायासाठी विद्यापीठ व महाविद्यालयाच्या दरवाज्यांवर हेलपाटे घालत आहेत. पण प्रशासनाने त्यांचा आवाज दाबण्यचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे.
विद्यार्थी जवळपास तीन महिन्यापासून त्यांच्या अडचणीसाठी महाविद्यालय आणि विद्यापीठात हेलपाटे घालत आहेत परंतु या विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या प्रशासनाला विद्यार्थ्यांची हित दिसत नाही स्वतःचा स्वार्थ बघणारे हे प्रशासन नेमकं विद्यार्थ्यांसाठी काम करते की स्वतःच्या तुंबड्या भरून घेण्यासाठी असा सवाल विद्यार्थ्यांनी केला.
कुलगुरू, प्र-कुलगुरू यांचेवर थेट आरोप?
विद्यापीठातील प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दमा यांची भेट घेतली असता यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात न घेता उलट सुलट उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या नुकसान केले. तसेच प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांना फोन संपर्क केला असता त्यांनी टाळाटाळ केल्याचा दुर्दैवी प्रकार पाहिला मिळाला.
दरम्यान, सांगोला महाविद्यालयाला युवा महोत्सव घेण्यास सांगितले असताना महाविद्यालयाने सुरुवातीला नकार दिला. परंतु विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी महाविद्यालयाला युवा महोत्सव घेण्यास सांगितले. यानंतर महाविद्यालय तयार झाले. या युवा महोत्सवला चार दिवसासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च होणार असून याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान करत असल्याने महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी विद्यार्थी यांनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्यावर नाराजीचा सूर ओढला आहे.
विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी असून अनेक नियम विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी आहेत. परंतु विद्यापीठाच्या आडमुठ्या प्रशासनाला हे नियम समजत नाहीत म्हणून की काय हे विद्यार्थ्यांचं नुकसान करतात असा आरोप प्राध्यापकांनी केला आहे.
कोट्यवधींचा खर्च – विद्यार्थ्यांचं नुकसान :
“आमचं नुकसान करून कोट्यवधी रुपयांचा युवा महोत्सव भरवता? आम्हाला न्याय नको का?” असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी युवा महोत्सवाच्या काळात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
विद्यार्थ्यांचा निर्धार :
“आमचे चार वर्षांचे नुकसान होत आहे, आता आम्ही गप्प बसणार नाही! युवा महोत्सवातच आंदोलन करू,” असा ठाम निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
