सांगोला : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक सुरक्षा व्यवस्था राबवण्यात येत आहे.
तैनात करण्यात आलेला बंदोबस्त पुढीलप्रमाणे आहे –
उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) : ०२
पोलीस निरीक्षक (PI) : ०१
सहाय्यक/उपनिरीक्षक (API/PSI) : १४
पोलीस अमलदार : २३०
SRPF : ०१ प्लाटून
गृह रक्षक दल : ३००
वरील प्रमाणे मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने कडेकोट पोलीस बंदोबस्त वापरण्यात येत असून, संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
