IN PUBLIC News : शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) स्कूल बससाठी कडक नियम लागू केले आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि RTO प्रशासनाने हे नियम अधिक काटेकोरपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
RTO नियमांनुसार स्कूल बस पिवळ्या रंगाची असणे बंधनकारक आहे. बसच्या पुढे व मागे ठळक अक्षरात “School Bus” असा फलक असावा. प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र, आपत्कालीन दरवाजा, तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पकड रॉड आणि नॉन-स्लिप पायदान असणे आवश्यक आहे. चालकाकडे वैध जड वाहन परवाना, किमान पाच वर्षांचा अनुभव आणि पोलिस पडताळणी असणे अनिवार्य आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित शाळा, बस चालक व मालकावर दंडात्मक कारवाई, परवाना निलंबन किंवा बस जप्तीची तरतूद आहे. पालकांनीही आपल्या मुलांची वाहतूक सुरक्षित आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन RTO कडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये स्कूल बससाठी RTO नियम :
- रंग आणि ओळख: बस पिवळ्या रंगाची असावी, पुढे व मागे ‘शालेय बस’ असे ठळकपणे लिहिलेले असावे आणि शाळेचे नाव व मार्ग क्रमांक दर्शवणारे फलक असावेत.
- सुरक्षा उपकरणे: प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र, जीपीएस ट्रॅकिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन (घाबरल्यास वाजवणारे बटन) आवश्यक आहेत.
- बसची स्थिती: बसची फिटनेस प्रमाणपत्र (Fitness Certificate) असावी, ती १५ वर्षांपेक्षा जुनी नसावी (मुंबईत ८ वर्षे) आणि तिची यांत्रिक स्थिती उत्तम असावी.
- चालक आणि कर्मचारी: चालकाला किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. महिला मदतनीस (महिलांसाठी) असावी.
- नियंत्रित वेग: वेग ताशी ५० किमी (मुंबई वगळता) किंवा स्पीड गव्हर्नर लावून ४० किमी/तास इतका मर्यादित असावा.
- विद्यार्थी तपशील: विद्यार्थ्यांची नावे, वर्ग, रक्तगट, चढण्या-उतरण्याचे ठिकाण यांची यादी बसमध्ये असावी.
- इतर सुरक्षा वैशिष्ट्ये: खिडक्यांना आडवे ग्रील्स, दरवाजे आणि चाकांचे दृश्य दिसण्यासाठी बहिर्वक्र आरसे, हँडल, सुरक्षित पायऱ्या असाव्यात.
- महाराष्ट्र सरकार सध्या अधिक कठोर नियमावली आणत आहे, ज्यात पॅनिक बटन, स्प्रिंकलर, जीपीएस आणि सीसीटीव्हीची सक्ती केली जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढेल.
- अनधिकृत बस चालकांवर कारवाई केली जाईल आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंड आकारला जाईल
स्वतःचं ठेवलं झाकून लोकांचं बघतात वाकून वाकून! न्यू इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेजच्या भंगार स्कूल बस? आता विद्यार्थ्यांचा जीव घ्यायचा राहिला आहे का?
