राजकीयमहाराष्ट्र

कुणाल कामरावर होणार कठोर कारवाई ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही


मुंबई / विशेष प्रतिनिधी: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे मोठा गदारोळ उडाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करण्याची ग्वाही विधीमंडळात दिली आहे.

कामराच्या वक्तव्यावर फडणवीसांचा जोरदार हल्ला

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले –
“स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा हक्क कोणालाही नाही. कुणाल कामराला हे समजले पाहिजे की, महाराष्ट्रातील जनतेने 2024 मध्ये कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे, हे स्पष्ट केले आहे. स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी विरासत कोणाकडे आहे, हे जनता ठरवेल.”

त्याचबरोबर, राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असेही फडणवीस यांनी ठणकावले.
तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करू शकता, पण कोणावरही अपमानास्पद टीका केली जाणार नाही. गरज पडल्यास कठोर कारवाई केली जाईल,”असा इशारा त्यांनी दिला.

रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीप्रकरणी धक्कादायक खुलासा : मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला इशारा

कामरावर कारवाईचा इशारा विधीमंडळात तणाव

विधीमंडळाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आमदारांनी कुणाल कामराच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्षेप घेतला.

मुख्यमंत्र्यांनीही कठोर कारवाईचा इशारा दिला.

कामराने माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

स्वातंत्र्याचा गैरवापर सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले.

शिवसैनिकांची स्टुडिओ तोडफोड गुन्हे दाखल

दरम्यान, कुणाल कामराच्या शो साठी वापरल्या गेलेल्या स्टुडिओवर काही शिवसैनिकांनी तोडफोड केली.

पोलिसांनी शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, काही जणांना ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात आमदार मुरजी पटेल यांनी तक्रार दाखल केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button