४३ व्या वर्षीही तितकीच ग्लॅमरस! ईशा देओलचा फॅशन लूक सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये

विशेष प्रतिनिधी: अभिनेत्री ईशा देओल सध्या तिच्या स्टाईल आणि आत्मविश्वासाने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

वयाच्या ४३व्या वर्षीही ती फॅशन आणि अदा यांमध्ये तरुणींनाही टक्कर देताना दिसते. नुकत्याच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या काही ग्लॅमरस फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ईशाने काळ्या रंगाच्या स्टायलिश आऊटफिटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा ग्लॉसी मेकअप आणि ओपन हेअर लूक विशेष उठून दिसत आहे.

तिच्या या फॅशनेबल लूकला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

ईशा देओल ही व्यक्तिगत आयुष्यातील बदलानंतरही सकारात्मकतेने पुढे जात असून, सोशल मीडियावर अधिक सक्रिय झालेली आहे.

उद्योजक भरत तख्तानी यांच्यासोबत घटस्फोटानंतर ती नव्या अध्यायाला सामोरी जात आहे.

तिच्या स्टाईल स्टेटमेंटमधून ती अनेक महिलांसाठी फॅशन आणि आत्मविश्वासाचे प्रतीक बनली आहे. तिचा प्रत्येक लूक हा ‘फॅशन गोल्स’ ठरतोय.
