
सोलापूर/गुरुनाथ ताटे : भाविक वारकरी मंडळा कडून आषाढीवारी श्री क्षेत्र पंढरपूर मधील अडचणी संदर्भात मा. कुमार आशीर्वाद साहेब जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयात निवेदन देण्यात आले. तसेच हे निवेदन मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांना ही ईमेल द्वारे पाठवले आहे. आषाढीवारी श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये असलेल्या 65 एकर – भक्तीसागर येथे महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या शिबीराचे स्वागत आहे पण ते शिबीर दुसऱ्या जागेवर आयोजित करावे . कारण 65 एकर मध्ये वारकरी मंडपाला जागा कमी पडते.
-जर पाऊस आला तर चिखल खूप होतो आणि वारकरी भाविकांना खूप त्रास होतो . त्या साठी 65 एकर वर सिमेंट काँक्रीट करावे.
-वारी कालावधी मध्ये टॉयलेट जास्त असावेत आणि सर्व टॉयलेट स्वच्छ असावेत तसेच तिथे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असावे .
-65 एकर मध्ये स्वतंत्र आपत्कालीन कक्ष असावा .
-सर्वाना पिण्याचे पाणी मोठया प्रमाणात उपलब्ध करणेसाठी तात्पुरते ऍरो प्लॅन्ट उभे करावे.
-परिवहन मंडळाच्या बस संख्या वाढवून प्रत्येक मार्गांवर स्थानक उभे करावे.
हे निवेदन देण्यासाठी सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ), जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), बळीराम जांभळे(राष्ट्रीय सचिव) , किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष) , मोहन शेळके (प्रदेश सचिव) , तुकाराम भोसले महाराज, पुरुषोत्तम सुरवसे, इ पदाधिकारी उपस्थित होते.