महाराष्ट्र

भाविक वारकरी मंडळाचे ९ मार्चला सांगोला येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलन

"हेचि आम्हा करणे काम | बीज वाढवावे नाम || "


सोलापूर/गुरुनाथ ताटे : “हेचि आम्हा करणे काम | बीज वाढवावे नाम || ” या संतउक्ती प्रमाणे वारकरी संप्रदायातील संत विचाराचे मंथन व्हावे, वारकरी संघटन व्हावे, समाज मनाला स्थिरता मिळावी या हेतूने भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून श्री संत नामदेव महाराज 16 वे वंशज ह.भ.प माधव महाराज नामदास (पंढरपूर) यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांचे मार्गदर्शनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन, अंबिका मंदिर चौक, तहसील कार्यालय, सांगोला जि. सोलापूर येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

अविरत सेवेचा झरा “डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान”सांगोला यांच्यावतीने ‘स्वच्छता मोहीम’

दि.09-03-2025  (रविवार) रोजी स. 9.30 वा. ग्रंथ दिंडी – अंबिका मंदिर ते हॉल – स. 10.00 वा. कार्यक्रम उदघाटन होणार असून ह.भ.प. निरंजननाथ योगीजी महाराज ( संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी – प्रमुख विश्वास्थ ) हे प्रथम सत्राचे अध्यक्ष असतील व प्रमुख अतिथी ह भ प श्रीगुरु गोपाळ अण्णा वासाकर महाराज ( वासाकर  फड – पंढरपूर ) असतील तसेच प्रमुख उपस्थिती ह भ प भागवत चवरे महाराज ( राष्ट्रीय उपाध्यक्ष ), ह.भ.प. अक्षय भोसले महाराज (प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी शिवसेना ) आचार्य तुषार भोसले (प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी भाजप ) मा. बाबासाहेब देशमुख आमदार, मा.समाधान दादा अवताडे आमदार, मा.दिपक (आबा) साळुंखे माजी आमदार, मा.शहाजी (बापू) पाटील माजी आमदार, मा.चेतनसिंह केदार सावंत ( जिल्हाध्यक्ष भाजप),  मा.राजा माने (संस्थापक अध्यक्ष- डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ), मा संतोष कणसे तहसीलदार सांगोला, डॉ .सुधीर गवळी मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद सांगोला, मा.भीमराव खणदाळे (पोलीस निरीक्षक, सांगोला ) हे असतील. तसेच दु. 2.00 वा. वारकरी मंडळ पदाधिकारी परिचय भेट, दु. 2.30 वा.महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व महिला पदाधिकारी मनोगत होऊन 4.00 वा समारोप व पसायदानाने सांगता करण्यात येणार आहे.

https://www.instagram.com/reel/DGu5cHmNsBE/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

तरी सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मा. सतीश भाऊ सावंत ( उपाध्यक्ष – डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ), जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष ) यांनी पत्रकार परिषद मध्ये केले. तसेच ज्ञानेश्वर माऊली भगरे ( जिल्हा अध्यक्ष ), बिरा बंडगर महाराज (सह जिल्हा अध्यक्ष ) अखिल भाविक वारकरी मंडळ सर्व पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत. या पत्रकार परिषदेसाठी बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव), प्रदेशाध्यक्ष ज्योतीराम चांगभले ज्ञानेश्वर माऊली भगरे (जिल्हाध्यक्ष – पंढरपूर विभाग ), महादेव दिवसे हे उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button