
MIDC
सांगोला : सांगोला तालुक्यातील विकासाला गती देण्यासाठी (MIDC) व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सांगोला तालुक्यासाठी नवीन भव्य एमआयडीसी उभारण्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी दिले आहे.(MIDC)
सांगोला तालुक्याचे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील (MIDC) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सांगोल्यात नवीन एमआयडीसी (MIDC) सुरू करण्याची ठाम मागणी केली. त्यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश लाभले असून, मंत्री सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरीचे आश्वासन दिले आहे.
Solapur University : पत्रव्यवहारात फसवणूक, वरिष्ठांची सुद्ध दिशाभूल; एका अधिकाऱ्यामुळे विद्यापीठ अडचणीत येणार का?
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की, “नवीन एमआयडीसीमुळे (MIDC) तालुक्यात उद्योग व्यवसाय वाढून अर्थव्यवस्था बळकट होईल, व्यापारी व औद्योगिकदृष्ट्या विकासाला चालना मिळेल. स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील.”
या भेटीवेळी उद्योगपती अभिजीत नलवडे, योगेश खटकाळे आणि विशाल खटकाळे उपस्थित होते. मंत्री उदय सामंत यांनीही सांगोला तालुक्यातील औद्योगिक विकासाला शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.