सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तहसील कार्यालयासमोर स्टॅम्प विक्रेत्यांकडून सर्वसामान्यांची लूट होत असताना अधिकारी मात्र मूग गळून गप्प आहेत चढ्या दराने स्टॅम्पची विक्री होत आहे प्रत्येक पाचशे रुपये च्या स्टॅम्पलास 550 व 100 रुपये स्टॅम्पला एकशे दहा रुपये घेतल्याशिवाय स्टॅम्प विक्री केली जात नाही
सांगोला तहसील कार्यालयासमोरील स्टॅम्प रायटर प्रकाश टकलेसह इतर स्टॅम्प विक्रेते 500 रुपये च्या स्टॅम्पला साडेपाचशे रुपये व १०० रुपयाच्या स्टॅम्पला एकशे दहा रुपये घेऊन स्टॅम्पची विक्री केली जात आहे सर्वसामान्यांची लूट करीत आहेत चढ्या भावांनी स्टॅम्पची विक्री केली जात आहे.
सर्वसामान्यांची व गोरगरिबाची मोठ्या प्रमाणावर लूट होत असताना अधिकारी मात्र दुर्लक्ष करतात आणि स्टॅम्प विक्रेत्यांवर अनेक जणांच्या तक्रारी असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले आहे प्रकाश टकले हा शंभर रुपयाच्या स्टॅम्पला 110 रुपये व पाचशे रुपये स्टॅम्पला 550 रुपये घेत असताना.
अनेकांनी व्हिडिओ चित्रण केलेले आहे.त्यामुळे चढ्या भावांनी स्टॅम्प विक्री करणाऱ्या स्टॅम्प विक्रेत्यावर गुन्हे दाखल करावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्वसामान्य नागरिकांनी दिला आहे.
प्रकाश टकलेची चौकशी पूर्ण होईपर्यंत सांगोला येथील ट्रेझरी कार्यालयाने यांना स्टॅम्प देऊ नये अशी ही मागणी करण्यात आली आहे.व यांचा स्टॅम्प विक्रीचा परवाना रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
