पालकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ
कोणत्या प्रतिज्ञापत्रांसाठी निर्णय लागू?

मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी, पालकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
महसूल मंत्र्यांनी केली मोठी घोषणा :
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले, “विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सरकारी कामांसाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांवरील खर्च कमी होणार आहे.
सांगोला शहरातील एका शाळा-महाविद्यालयाचे गडबड-घोटाळे? सत्य येणार जनतेसमोर…! https://inpublicnews.com/inpublicnews-marathi-digital-media-house-sangola-solapur-district/कोणत्या प्रतिज्ञापत्रांसाठी निर्णय लागू?
- जात पडताळणी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र
- राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
- इतर शासकीय कामांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे
विद्यार्थ्यांना विशेष फायदा:
दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामांसाठी अनेक प्रतिज्ञापत्रे सादर करावी लागतात. यासाठी त्यांना मोठा खर्च येत होता. मुद्रांक शुल्क माफ झाल्याने विद्यार्थ्यांचा हा खर्च आता वाचणार आहे.
या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्रासोबत 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क जोडण्याची गरज नाही. त्याऐवजी, साध्या कागदावर ‘सेल्फ-अटेस्टेड’ अर्ज लिहून ही प्रमाणपत्रे तहसील कार्यालयातून मिळवता येतील.