SSC Result २०२५ : उद्या दहावीचा निकाल जाहीर; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार

मुंबई / प्रतिनिधी : बारावीचा निकाल लागल्यानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) दहावीचा निकाल उद्या, १३ मे २०२५ रोजी जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन स्वरूपात प्रसिद्ध केला जाईल.
१६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य उद्या ठरणार
यंदाच्या वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांत ही परीक्षा पार पडली होती. आता उद्या या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार असून, निकालाच्या अगोदर शिक्षण मंडळ एक पत्रकार परिषद घेऊन निकालाची सविस्तर आकडेवारी जाहीर करणार आहे.
कुठे आणि कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील अधिकृत संकेतस्थळांवर भेट द्यावी:
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव आवश्यक असेल. ऑनलाईन मार्कशीटमध्ये विषयवार गुण, जन्मतारीख, आणि रोल नंबर यांचा समावेश असेल.