श्री मल्लू देवीची यात्रा : भक्ती, उत्साह आणि परंपरेचा अनोखा संगम
भक्तांच्या सेवेसाठी ग्रामस्थांचे योगदान

सांगली/ विशेष प्रतिनिधी : घोरपडी आणि निमज डोंगरावर दरवर्षी भक्तीमय वातावरणात पार पडणारी श्री मल्लू देवीची यात्रा चैत्र शुद्ध पंचमी, गुरुवार, 3 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
यात्रेचा विशेष सोहळा
– फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला हजारो फुलेकरी सुगंधी फुलांचे दुरडे घेऊन विजापूरहून प्रस्थान करतात.
– अमावस्येला घोरपडी आणि निमज डोंगरावरील श्री मल्लू देवीला फुले अर्पण केली जातात.
– यात्रेच्या मुख्य दिवशी (3 एप्रिल 2025)
– पहाटे 4 ते 6 दरम्यान देवीला दंडवत घालण्याचा विधी.
– सकाळी 6 ते 8 महाआरतीचा भव्य सोहळा.
– सकाळी 11 ते संध्याकाळी 7 महानैवेद्य आणि लहान मुलांचे जावळ काढण्याचा कार्यक्रम.
– रात्री 9 ते पहाटे 4 गोंधळी आणि ओविकार मंडळाचा खास सांस्कृतिक कार्यक्रम.
– पहाटे 4 ते 6 पालखी मिरवणूक आणि सबिना सोहळा
भक्तांच्या सेवेसाठी ग्रामस्थांचे योगदान
यात्रेच्या काळात घोरपडी ते विजापूर हे सुमारे 100 किमीचे अंतर भक्तगण पायी पार करतात. मंदिराभोवती सुगंधी फुलांची सजावट, रोषणाई आणि भंडाऱ्याची उधळण होत असते. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी घोरपडी व निमज गावच्या ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग आहे.