महाराष्ट्र
भरधाव कारने दुचाकीस जोरदार धडक; पती-पत्नींचा जागीच मृत्यू

केळवदजवळील अपघाताने परिसरात हळहळ; कार चालक फरार
बुलढाणा/प्रतिनिधी: बुलढाणा–चिखली मार्गावर केळवद गावाजवळील शाळेजवळ एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नींचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवार, २० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घडली.
मृतकांची ओळख:
- गणेश प्रकाश गायकवाड ( शिक्षक )
- उषा गणेश गायकवाड
(दोघेही रा. पळसखेड गायकवाड, ह.मु. संभाजीनगर, चिखली)
गणेश गायकवाड आणि त्यांची पत्नी उषा हे दुचाकीवरून चिखलीहून बुलढाण्याकडे जात असताना, केळवद शाळेजवळ एमएच-१२ जेसी-४८५६ क्रमांकाच्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दोघेही घटनेस्थळीच ठार झाले.
पोलिसांची कारवाई:
अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, कार चालक अपघातानंतर पळून गेला आहे. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.