महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री क्षेत्र जोतिबांच्या खेट्यास उद्यापासून सुरुवात,पुजारी आनंदा लादे म्हणाले…

पंचगंगा नदीत स्नान करून अनवाणी पायाने जोतिबा डोंगरावर चढून गायमुख ते जोतिबा पायरीपर्यंत खेटे पूर्ण केले जातात


कोल्हापूर/राजू मुजावर : पश्चिम महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना रविवार, 16 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. ही यात्रा 9 मार्चपर्यंत चालणार असून, माघ महिन्यातील चारही रविवारी परंपरागत खेटे पार पडणार आहेत. यासाठी वाडीरत्नागिरी येथील जोतिबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार असून प्रशासनाने सज्ज झाले आहे. 

पुजारी आनंदा लादे यांनी इन पब्लिक न्युजशी बोलताना म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री क्षेत्र जोतिबांच्या खेट्यास उद्या रविवारी 16 फेब्रुवारी पासून सुरवात होत आहे, 9 मार्च पर्यंत हे खेटे यात्रा सुरू असणार आहे,  खेट्यासाठी वाडीरत्नागिरी येथील जोतिबा मंदिरात भाविकांची गर्दी होते, या साठी प्रशासनाने  नियोजन केले आहे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दर्शन रांगेचे देखील नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी माघ महिन्यातील चार रविवार  हे  चार खेटे होणार आहेत. परंपरागत खेटे चारच असतात पण पाचवा खेटा हा नैवेद्य करण्यासाठी असतो असे पुजारी आनंदा लादे यावेळी बोलताना म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यातील भाविक दक्खनच्या राजा श्री जोतिबा दर्शनासाठी  डोंगरावर पहाटे पासूनच गर्दी करतात. खेटे हे कोल्हापूर येथील पंचगंगा नदी काठी अंघोळ करून पायी अनवाणी चालत करतात, व डोंगरावर येऊन गायमुख ते जोतिबा पायरीवर खेटे पूर्ण करतात.पाचव्या खेट्यास पुजारी घरी पुरण पोळी व एळावनी आमटी चा नैवेद्य करून खेटे पूर्ण होतात.ही वर्षानुवर्षे अखंड चालत आलेली भक्ती परंपरा आहे, असे पुजारी आनंदा लादे इन पब्लिक न्यूजशी बोलताना म्हणाले.  

कोल्हापूरचे हॉकीपटू चमकले! आंध्रप्रदेश येथील नागरी सेवा हॉकी स्पर्धेसाठी ११ खेळाडूंची निवड

भाविकांची निष्ठा आणि परंपरा

माघी पौर्णिमेनंतर सुरू होणाऱ्या या खेट्यांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील हजारो भाविक पायी चालत जोतिबा डोंगरावर येतात. पंचगंगा नदीत स्नान करून अनवाणी पायाने जोतिबा डोंगरावर चढून गायमुख ते जोतिबा पायरीपर्यंत खेटे पूर्ण केले जातात.

पाचवा खेटा नैवेद्यासाठी

परंपरेनुसार चार खेटे पार पडल्यानंतर पाचवा खेटा नैवेद्यासाठी असतो. यावेळी पुजारी घरी पुरणपोळी आणि एळवणी आमटीचा नैवेद्य करून खेटे पूर्ण करतात. ही परंपरा वर्षानुवर्षे अखंडपणे सुरू आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी आनंदा लादे यांनी ‘इन पब्लिक न्यूज’शी बोलताना दिली.

दर्शनासाठी विशेष नियोजन

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, पार्किंग व्यवस्था, तसेच पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

भाविकांसाठी योग्य सोयी आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले असून, यंदाच्या खेट्यात लाखो भाविक सहभागी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button