कृषीमहाराष्ट्र

मराठी नवं वर्षात पावसाची हजेरी; IMD ने या जिल्ह्यांना दिला इशारा

पावसामुळे पुढील दोन दिवसांत तापमान 2-3 अंशांनी घसरण्याची शक्यता आहे


विशेष प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या तोंडावर राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 31 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने यासंदर्भात येलो अलर्ट जारी केला असून, शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात कुठे-कधी पाऊस?

31 मार्च:

येलो अलर्ट: ठाणे, पालघर, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग.

हलक्या पावसाची शक्यता: रायगड, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, बीड, जळगाव, संभाजीनगर.

 1 एप्रिल:

येलो अलर्ट: ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, नाशिक, जळगाव, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना.

 हलक्या पावसाची शक्यता: पालघर, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नंदुरबार, धुळे.

 2 एप्रिल:

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता, विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात येलो अलर्ट लागू.

हवामान बदलाचे कारण काय?

महाराष्ट्रावर सध्या पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव जाणवत आहे.

छत्तीसगड, कर्नाटक, तामिळनाडू आणि अंदमान समुद्राजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे राज्यात पावसाचे वातावरण तयार झाले आहे.

तापमानात बदल होणार?

विदर्भात उष्णतेची लाट सुरू असून, चंद्रपूर 42°C, नागपूर 41.8°C, वर्धा 41.9°C तापमान नोंदले गेले आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 38-40°C दरम्यान तापमान आहे.

पावसामुळे पुढील दोन दिवसांत तापमान 2-3 अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी सूचना:

पिकांचे संरक्षणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात.
विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने उघड्यावर काम करताना खबरदारी घ्यावी.
वाहनचालकांनी निसरड्या रस्त्यांवर सावधगिरी बाळगावी.
अधिकृत हवामान अपडेट्सवर विश्वास ठेवावा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group