सिंहगड महाविद्यालयामध्ये गेट परीक्षा तयारी आणि करिअर संधीसाठी विशेष व्याख्यान
वाडने हे स्वत: गेट परीक्षेत पाच वेळा उत्तीर्ण होऊन सर्वोच्च रँकिंगमध्ये AIR 231 प्राप्त केली आहे.

पंढरपूर/हेमा हिरासकर : सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथे यांत्रिकी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “गेट परीक्षा तयारी आणि करिअर संधी” या विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून शंकर वाडने हे उपस्थित होते. वाडने हे स्वत: गेट परीक्षेत पाच वेळा उत्तीर्ण होऊन सर्वोच्च रँकिंगमध्ये AIR 231 प्राप्त केली आहे.
या सत्राचा उद्देश विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट अप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (गेट) च्या महत्त्वाबद्दल संपूर्ण माहिती देणे होता. वाडने यांनी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी, गेटमध्ये चांगली रँक मिळविण्याचे फायदे याबद्दल माहिती दिली. त्यांनी IITs, NITs, आणि IISc सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षणाच्या विविध संधींचा उल्लेख केला, तसेच गेट पात्रतेच्या आधारावर सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या याबद्दल चर्चा केली.
त्यांनी PSU मध्ये गेटच्या उपयोगाबद्दल सांगितले, जसे की IOCL, ONGC, BHEL, NTPC, आणि DRDO या कंपन्या गेट स्कोअरच्या आधारे अभियंत्याची निवड कशी करतात. त्यांनी उच्च शिक्षणासाठी संशोधन संधी, M.Tech प्रवेश, Ph.D. प्रवेश आणि शिष्यवृत्त्या याबद्दलची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी या सत्रात सक्रिय सहभाग घेतला आणि परीक्षेच्या पद्धती, तयारीसाठी साहित्य, आणि प्रभावी वेळ व्यवस्थापन तंत्राबाबत प्रश्न विचारले. श्री. वाडने यांनी त्यांच्या मौल्यवान ज्ञानाची देवाणघेवाण करून विद्यार्थ्यांना गेटच्या तयारीसाठी मेहनत करण्यास प्रेरित केले.
हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. के. जे. करांडे आणि यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. डॉ. ए. एस. आराध्ये कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले व श्री. वाडने यांचे विद्यार्थ्यांना दिलेल्या मौलव्यान सल्याबाबत आभार व्यक्त केले.