महाराष्ट्रसांगोला

मजूर पालकांचा मुलगा दुसऱ्यांदा अधिकारी; बहिणीचंही अधिकारी होण्याचं स्वप्न


पंढरपूर/प्रतिनिधी :”दुसऱ्याच्या रानात मजुरी करून अजयला शिकवलं आणि आज त्यानं आमचं नाव उज्ज्वल केलं,” अशी भावना तिसंगी ता. पंढरपूर येथील अजय सरवदे यांच्या आईने व्यक्त केली आहे.


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेत ग्रामीण भागातील अजय सरवदे यांची आयपीएस (IPS) पदासाठी निवड झाली आहे, ही तिसंगी गावासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC निकालात अजय सरवदे याने ८५८ वी रँक पटकावून घवघवीत यश संपादन केलं आहे. याआधीही अजयने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती, आणि सध्या ते भोपाळ येथील असिस्टंट स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ डायरेक्टर ऑफिसर पदावर कार्यरत आहेत.

अजयचे वडील नामदेव सरवदे यांचे शिक्षण नववी पर्यंत तर आई निरक्षर आहेत. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असूनही अजयने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं. अजयचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसंगी येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे पूर्ण झाले.

अजयच्या यशानंतर गावात आनंदाचं वातावरण आहे. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रशांतराव परिचारक, रामेश्वर कारंडे, अर्जुन खरात, अविनाश रूपनर, बालाजी पाटील आदींसह ग्रामस्थांनी त्याचं अभिनंदन केलं.

अजयचे वडील नामदेव सरवदे म्हणाले, “मी आणि माझी पत्नी सारिका दोघंही मोलमजुरी करून घर चालवायचो. कष्टाशिवाय अन्न मिळायचं नाही. अशा परिस्थितीत आम्ही दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. आज मुलगा अजय मोठा अधिकारी झाला आहे, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आमची मुलगी कांचनही सध्या एमपीएससीची तयारी करत आहे आणि अधिकारी होण्याचं तिचंही स्वप्न आहे.”


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button