आरोग्यमहाराष्ट्र

डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरण : “घरची ‘मेंबर’ ते आत्महत्येच्या गुन्ह्यातील आरोपी: मनीषा माने-मुसळे कोण आहे?”


डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर शहरात खळबळ; एकेक करत उघडकीस येत आहेत मनीषच्या गोष्ठी

सोलापूर /प्रतिनिधी : प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनीषा माने-मुसळे हिच्याभोवती सध्या चर्चांचा विषय निर्माण झाला आहे. वळसंगकर हॉस्पिटलमध्ये प्रशासन अधिकारी असलेल्या मनीषा यांचं नाव डॉक्टरांच्या सुसाईड नोटमध्ये आले आणि त्या आधारे पोलिसांनी तिला अटक केली.

हॉस्पिटलमधून घरची सदस्य झाली!

मुळची मरीआई चौकातील गवळी वस्ती येथील रहिवासी असलेली मनीषा, शिक्षण घेत असतानाच हॉस्पिटलमध्ये काम करू लागली. सुरुवातीच्या काळात तिने आपल्या मेहनतीने आणि सुसंवादाने वळसंगकर कुटुंबावर प्रभाव टाकला. काही काळातच ती घरची सदस्य झाली, तर हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ पदावरही पोहोचली.
“डॉक्टरांनी तिला कन्येसमान मानले होते” असे म्हणणारेही अनेकजण आज पुढे येत आहेत.

सुसाईड नोटमधील गंभीर आरोप
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे पुत्र डॉ. अश्विन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, “ए.ओ. माने-मुसळे” हिच्यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं डॉक्टरांनी चिठ्ठीत नमूद केलं होतं. या आधारे पोलिसांनी तिला शनिवारी रात्री अटक केली.

अंत्ययात्रेत रडत सहभागी
मनीषा डॉक्टरांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाली होती का, याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. काही साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, ती रडत-रडत अंत्ययात्रेत सामील झाली होती, आणि तिचा तो फोटोदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हॉस्पिटलने दिला रुग्णसेवेचा संदेश
या दु:खद घटनेनंतरही वळसंगकर हॉस्पिटलने रुग्णसेवेची परंपरा खंडित होऊ दिली नाही.
• डॉ. वळसंगकर यांच्यावर अंत्यसंस्कार; ओपीडी बंद, पण तातडीची सेवा सुरू
• रविवार; ओपीडी बंद
• नियमित ओपीडी पुन्हा सुरू होणार
या प्रकरणात अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
• डॉक्टर आणि मनीषा यांच्यात नक्की काय घडलं?
• मनीषाने सत्तेचा गैरवापर केला का?
• आत्महत्येमागचं नेमकं कारण काय?

या प्रकरणातील पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. डॉक्टरांच्या कुटुंबीयांचे आणि मनीषाच्या पार्श्वभूमीतील अनेक पैलू सध्या पोलिसांच्या तपासाचा भाग आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button