सांगोला शहरातील बनकरमळा येथे रामनवमी उत्साहात साजरी; दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

सांगोला/ महेश लांडगे: सांगोला शहरातील बनकरमळा येथे आज रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. येथील रहिवासी दत्तात्रय नवले यांच्या निवासस्थानी गेल्या बारा वर्षांपासून रामनवमीचा सोहळा आयोजित करण्याची परंपरा आहे आणि यावर्षी तेराव्या वर्षाचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता कीर्तन सोहळ्याने झाली.या कीर्तनात नामवंत महाराजांनी रामकथेचे महत्त्व विशद केले, ज्यामुळे उपस्थित भाविक तल्लीन झाले होते. त्यानंतर, दुपारी १२ वाजता आकर्षक पुष्पवृष्टीचा कार्यक्रम पार पडला. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला.

या रामनवमी उत्सवाला शहरातील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक, तसेच विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले.

दत्तात्रय नवले यांनी सांगितले की, ‘प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने आणि सर्व भाऊ,काका, नातेवाईक, मित्र यांचा सहकार्याने हा सोहळा गेली १२ वर्षे यशस्वीपणे आयोजित करता आला आहे. यापुढेही ही परंपरा कायम ठेवण्याचा आमचा मानस आहे.
यावेळी डॉ. प्रभाकर माळी, (चेअरमन सां.शे.स.सूतगिरणी, अध्यक्ष सांगोला अर्बन बँक), मा. नगरसेवक गजानन बनकर, भीमराव बनकर, सुरेश आप्पा माळी (मा.उपनगराध्यक्ष), दत्ता सावंत, विकास पिसे, उल्हासदादा धायगुडे, अतुल उकळे व त्यांचे टीम, सचिन फुले (चेअरमन खरेदी विक्री संघ), रमेश जाधव, पी.एस.आय सचिन वसमळे, प्रशांत कांबळे, गजानन भाकरे, धनंजय भाकरे, माझी प्राचार्य बनकर सर, सोमनाथ बनकर, प्रगतशील बागायतदार औदुंबर माळी, मधुकर भडंगे(अध्यक्ष होलार समाज), उद्योगपती शिवम आदाटे, पत्रकार अशोक बनसोडे, डॉ. प्रवीण बनकर, दत्तात्रय नामदेव नवले, शिवाजी बनकर, शहाजी नलवडे, वसंत फुले, शिवाजी आण्णा उकळे, सोमनाथ राऊत , राजेंद्र यादव, वसंत फुले, रमेश जाधव, राजू गोडसे, महादेव आप्पा वाघमारे, रमेश जाधव, विक्रांत बनकर, आनंद शिवगुंडे, भूषण पतंगे, जगदीश कवडे, अभिजीत नलवडे, बनकर मळ्यातील सर्व नागरिक व आदी मान्यवर उपस्थित होते.

एकंदरीत, सांगोला शहरातील बनकरमळा येथे रामनवमीचा उत्सव मोठ्या धार्मिक उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. ज्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.