धक्कादायक! सोलापूर विद्यापीठ, उ.शि.सहसंचालकांच्या संगनमताने प्राध्यापकांची लुट करत कोट्यावधींचा भ्रष्टाचार?
प्राध्यापकांच्या प्लेसमेंटसाठी भरवला "कॅम्प"

सोलापूर/रोहित हेगडे : पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ सोलापूर व विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर संगनमताने दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्राध्यापकांचे वेतन निश्चिती (प्लेसमेंट) याबाबत कॅम्प घेण्यात आला. यातूनच प्राध्यापकांकडून कोट्यावधीची लुट केल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्राध्यापकांच्या प्लेसमेंटसाठी भरवला “कॅम्प”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाने दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्राध्यापकांच्या प्रमोशनसाठी कॅम्प भरवला होता. या कॅम्पमध्ये प्रत्येक प्राध्यापकांकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, सोलापूर यांच्या एका सहीची किंमत लाखो रुपये असून प्राध्यापकांना ती मोजावीच लागली आहे. सदर भ्रष्टाचार हा मोकाट पद्धतीने सुरू असून यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे? का असा सवाल प्राध्यापकांनी केला आहे.
India AI Mission : भारत जगात लवकरच होणार AI चा राजा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी रणनीती
दमदाटी आणि धमक्यांचा सपाटा : प्राध्यापकांना वेठीस धरले
तसेच, पैसे देत नसाल तर प्लेसमेंट होणार नाही असा सक्त इशारा घोटाळेग्रस्तांनी दिला आहे. तसेच पैसे देऊन केलेले प्लेसमेंट यावर कोणताही प्राध्यापक वाच्यता करणार नाही असे सांगून मुस्कटदाबी करत दमदाटी,धमक्या देऊन प्राध्यापकांना वेठीस धरले आहे.
गेंड्याच्या कातडीचे, लुटारू अधिकारी : प्राध्यापकांचा सूर
दरम्यान, या लुटारूंनी तर “प्राईज लिस्ट” चा ‘मेनू कार्ड’ जाहीर केला होता. यामध्ये पहिले प्लेसमेंटसाठी १० हजार दुसरे प्लेसमेंटसाठी २० हजार, तिसरे प्लेसमेंटसाठी ५० हजार तर चौथे प्लेसमेंटसाठी १ लाख रुपये एवढी मोठी रक्कम असलेला मेनू कार्ड यांनी प्राध्यापकांना दिला. हे पाहून काही प्राध्यापकांना तर चक्करच आली. या कॅम्पमध्ये काही प्राध्यापकांचे एका वेळी २-२ प्लेसमेंट होते, अश्या प्राध्यापकांना यावेळी मोठी रक्कम मोजावी लागली.
वरिष्ठ अधिकारीही या भ्रष्टाचाराला पाठबळ देताहेत?
या घोटाळ्यामागे संचालक, उच्च शिक्षण विभाग पुणे येथील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. ही लूट आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी प्राध्यापकांनी केली आहे.
प्राध्यापकांनी दिलेली माहिती :
इन पब्लिक न्यूजशी बोलताना काही प्राध्यापकांनी याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ सोलापूर व विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी चक्क नेहमीप्रमाणे स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी प्राध्यापकांचे प्रमोशनसाठी कॅम्प भरवला होता. या अधिकाऱ्यांचा इतिहास सांगतो की, हे कधीही कोणतेही काम पैसे घेऊन, प्राध्यापकांना नाहक त्रास देऊन करतात. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांना हे लोक जुमानत नाहीत. परंतु आता यांना स्वत:च्या चैनीसाठी पैसे कमी पडले की काय म्हणून स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी हा कॅम्प घेतला का ? संचालक,उच्च शिक्षण पुणे विभाग येथील काही अधिकारी यांना पाठीशी घालून हा गैरव्यवहार करत आहेत का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिक्षकांचा पगार न दिल्याने हायकोर्टाचा दणका : जि.प.सीईओंचे वेतन स्थगित