Solapur University : पत्रव्यवहारात फसवणूक, वरिष्ठांची सुद्ध दिशाभूल; एका अधिकाऱ्यामुळे विद्यापीठ अडचणीत येणार का?
मा. उच्च न्यायालयाचे आदेशही धाब्यावर? वरिष्ठ पाठीशी घालण्यात मग्न?

विशेष प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील (Solapur University)दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता चक्क मा. उच्च न्यायालयाच्याच आदेशाला धुडकावून केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी उलटसुलट कारभार करत एक अधिकारी सुसाट सुटले आहेत.(Solapur University) वरिष्ठांची दिशाभूल करत पत्रव्यवहारात घोटाळे करत अनेक पत्रव्यवहार हे स्वतःच्याच सहीने केले आहेत. हे केवळ पैशाच्या हव्यासापोटी आदेशाची पायमल्ली केली आहे का?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमराव मेटकरी नामक अधिकारी यांनी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून अनेक चुकीचे पत्रव्यवहार स्वतःच्याच सहीने केले आहेत.(Solapur University) विशेष म्हणजे, मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत पुढाकार घेतला. यामध्ये शासन, विद्यापीठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही फसवणूक होत असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.
तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करणं विद्यापीठाचं (Solapur University) काम होतं. मात्र त्या ऐवजी संबंधित अधिकाऱ्याने तब्बल एक ते दीड वर्षापासून हेळसांड केली. एवढंच नाही तर योग्य अधिकार नसलेल्या विभागांना मुद्दाम या प्रकरणात गुंतवून गोंधळ माजवला. परिणामी, विद्यापीठाची प्रशासकीय विश्वासार्हता धोक्यात आली आहे. मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर एक ना अनेक वेळा उमराव मेटकरी या व्यक्तीने आदेशाचा अवमान केला आहे. असे असताना देखील वरिष्ठ यांना पाठीशी घालण्यात मात्र मग्न आहे का?
मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या आदेशानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी विद्यापीठाकडून होणे अत्यंत गरजेचे होते. परंतु तसे न करता केवळ आणि केवळ पैशासाठी यांनी अनेक चुकीचे पत्रव्यवहार करत सोलापूर विद्यापीठात नवा इतिहास घडवला आहे.
तब्बल एक ते दीड वर्षानंतर यांना त्याविषयी पाठपुरावा केला तर एक ते दीड महिन्यानंतर हे त्यावर आणखी उलट सुलट करत ज्या विभागाचे अधिकार नाहीत अशा विभागाला मध्यस्थी करून चुकीच्या प्रकारे पत्रव्यवहार करत वरिष्ठांची दिशाभूल उमराव मेटकरी यांनी केल्याचे उघड झाले आहे.
शासन, विद्यापीठ, वरिष्ठांची फसवणूक करणाऱ्या, विद्यापीठाला गालबोट लागेल आणि ते होऊ नये तसेच विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत असून उमराव मेटकरी यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
सध्या या प्रकरणाची शासन दरबारी गंभीर दखल घेण्यात येत असून, लवकरच उच्चस्तरीय चौकशी आणि निर्णयाची शक्यता वर्तवली जात आहे.
पाहा पुढील भागात…!
कोणाचेही, कशाचीही भीती न बाळगता पत्रकारांना दमदाटी धमक्या कशा प्रकारे…
“मी कुणालाही घाबरत नाही!” हा उर्मटपणा कोणाच्या…
“शिक्षण क्षेत्रातील नियम, कायदे, इतर माहिती नसलेले विद्यापीठाचे मोठ्या पदावर…
“उच्च स्तरीय अधिकाऱ्यांचे अशोभनीय …