
Stree Shakti Social Foundation
सोलापूर : स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन हे महिला व युवतींना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देते आणि त्यांना एक सुरक्षित व सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. या संस्थेच्या वतीने महिलांच्या व युवतीच्या अनेक अडचणी सोडवण्याचा काम, होणारे अत्याचार, शिक्षण, कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी संस्थेच्यावतीने उपलब्ध होत आहेत.
स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन महिला व युवतींना मदतीचा हात देते.त्यांना कायदेशीर सल्ला , समुपदेशन ,व्यावसायिक प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीद्वारे आत्मनिर्भर बनवण्यास प्रोत्साहन देते. स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन चे युवती व महिला योद्धा गौरी लिगाडे,निकिता बघेल,रुचिका जमदाडे ,सारिका मनाळे,श्रीदेवी शिवशरण ,भाग्यश्री बिंदगे,सानिका गंतेलू,भाग्यश्री कोकणे ,योगिता मुळे ,योगिता वाघमारे,बालमनी कस्सा यांची कोअर कमिटी सदस्य पदी निवड करण्यात आली.
स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण माशाळकर यांनी सर्व योद्धांची निवड केली. त्या वेळेस कोअर कमिटी सदस्य भाग्यश्री राठोड,स्वाती खरवळे, आशा फुलेवार यांची उपस्थिती होती.