Neurosurgeon Dr. Shirish Walsankar
सोलापूर/प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक माहिती समोर येत आहे. शहरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतली आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिल्लेल्या माहितीनुसार, आज शुक्रवार दिनांक 18 रोजी रात्री ८.३० च्या दरम्यान त्यांनी राहते घरी सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी बंगल्यात गोळी झाडल्याचे समोर येत आहे. याबाबत सदर बाजार पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री ८.३० च्या सुमारास स्वतःच्या डोक्यात दोन गोळ्या मारून घेतल्या आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ त्यांचे स्वतःचे वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्या ठिकाणी नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली असून उपचार सुरु असताना त्यांची अखेरची झुंज अयशस्वी ठरली अशी माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टर वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचा तपास पोलीस करत आहेत.
