राजकीयमहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच सोलापूर बाजार समितीच्या सभापतीची निवड; नाव अद्याप गुप्त


सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांवर कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मात्र, ही निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरच होईल, अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे हेही उपस्थित होते. या बैठकीत बंद खोलीत बाजार समितीच्या पदांबाबत चर्चा झाली असली तरी, कोणतेही अंतिम नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

प्रारंभिक चर्चेनुसार, माजी आमदार दिलीप माने यांचे नाव सभापती पदासाठी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तथापि, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांचीही नावं चर्चेत असल्याने, अंतिम निर्णय ऐनवेळी बदलू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, रविवारी दि. ११ रोजी या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, अंतिम निर्णय कोणाच्या पारड्यात जाईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button