सातारा : एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा उपनगरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय चुलत बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे क्रूर कृत्य समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघी १३ वर्षांची आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिचा २५ वर्षीय चुलत भाऊ तिच्यावर सातत्याने बलात्कार करत होता. “जर तू हे कोणाला सांगितले, तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला जीवे मारून टाकेन,” अशी धमकी देऊन त्याने पीडितेला गप्प ठेवले होते. त्यामुळे भेदरलेल्या मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
दरम्यान, पोटात असह्य वेदना होऊ लागल्याने पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर घरच्यांनी विचारपूस केल्यानंतर, पीडित मुलीने आपल्या चुलत भावानेच अत्याचार केल्याचे सांगितले. या खुलाशानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
या गंभीर प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी चुलत भावाला अटक केली आहे. पुढील तपास करत आहेत.
