महाराष्ट्र

संभाजी आरमार शाही पालखी सोहळा प्रमुखपदी प्रा. मल्लिकार्जुन परळकर यांची निवड

छत्रपती शिवरायांच्या वारशाला साजेशा पद्धतीने भव्य-दिव्य शाही पालखी होणार सोहळा आयोजित होणार


सोलापूर / हेमा हिरासकर : संभाजी आरमारच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शाही पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी विशेष बैठक डॉ. निर्मलकुमार फडकुले पटांगण येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यंदाच्या पालखी सोहळा प्रमुखपदी प्रा. मल्लिकार्जुन परळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सुशील बंदपट्टे आणि सचिवपदी महेश हनमे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

शाही पालखी सोहळा भव्य-दिव्य करण्याचा निर्धार
प्रा. मल्लिकार्जुन परळकर यांनी सोहळ्याच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर आपले विचार मांडताना, “छत्रपती शिवरायांच्या वारशाला साजेशा पद्धतीने भव्य-दिव्य शाही पालखी सोहळा आयोजित करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे,” असे प्रतिपादन केले.

संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी या सोहळ्यात सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन करताना शिव-विचारांचा प्रसार आणि संस्कार रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले. “आपले कुटुंब सक्षम आणि सुसंस्कृत बनवायचे असेल तर शिव-विचारांचा अवलंब हा सर्वोत्तम मार्ग आहे,” असे ते म्हणाले.

बैठकीला मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
या बैठकीला शिवाजी वाघमोडे (कार्याध्यक्ष), प्रकाश डांगे (प्रदेश संघटक), गजानन जमदाडे (सरचिटणीस), शशिकांत शिंदे (उपाध्यक्ष), अनंतराव नीळ (जिल्हाप्रमुख), सागर ढगे (शहरप्रमुख), अमित कदम (जिल्हा संघटक), अजिंक्य पाटील (शिक्षक संघटना जिल्हाप्रमुख) यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाही पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्ये
यंदा १९ फेब्रुवारी रोजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघणाऱ्या या पालखी सोहळ्यात शिवप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा भव्यतेत भर घालण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली असून, सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाचे प्रतीक म्हणून साजरा होणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button