
Sinhagad College pandharpur
पंढरपूर/हेमा हिरासकर : महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्फत महात्मा बसवेश्वर जंयती निमित्त घेण्यात आलेल्या खुल्या निंबध स्पर्धेत सिंहगड महाविद्यालय, पंढरपूरची विद्यार्थीनी कु.वृषाली नवनाथ वाघमारे हिचा द्वितीय क्रमांक आला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. कु.वृषाली हिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्फत पुरस्कृत करुन स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
तिच्या या यशाबददल सिंहगड महाविद्यालयामध्येही तिचा सत्कार यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कोर्टी, पंढरपूर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. कोंडूरु, डॉ. गंधारे, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, प्रा. नामदेव सावंत यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी तीचे कौतुक करण्यात आले.