सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
द्वितीय व तृतीय वर्षातील एकूण 150 विद्यार्थी उपस्थित होते

पंढरपूर/विशेष प्रतिनिधी : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी, पंढरपूर येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात या संवादासाठी कुमार शुभम सादिगले यास आमंत्रित करण्यात आले होते.
शुभम सादिगले हे 2023-24 बॅचचे विद्यार्थी असून ते सध्या सिडॅक पुणे येथे कार्यरत आहेत. या संवादात त्यांनी विद्यार्थ्यांना सिडॅक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी कशी तयारी करावी तसेच सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधी, आवश्यक कौशल्य याची उपयुक्त माहिती दिली. या कार्यक्रमाला कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाच्या द्वितीय व तृतीय वर्षातील एकूण 150 विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पूनम गवळी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.