
श्रावण विशेष : श्रावण (Shravan 2025) महिना म्हणजे भक्तिभाव, व्रत, उपवास आणि महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचा काळ. शिवमहापुराणात वर्णन केलेले १२ ज्योतिर्लिंग केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. १२ राशी आणि १२ ज्योतिर्लिंग यांच्यातील नाते हे भक्तांसाठी विशेष मार्गदर्शक ठरू शकते.
शिवमहापुराणानुसार (Shravan 2025) भारतात वसलेली १२ पवित्र ज्योतिर्लिंगे सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वरम आणि घृष्णेश्वर या प्रत्येकाचे विशिष्ट राशीशी गूढ नाते आहे.
चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या राशीला कोणते ज्योतिर्लिंग अनुकूल आहे आणि त्याची पूजा केल्याने कोणता विशेष लाभ मिळतो: (Shravan 2025)
मेष
ज्योतिर्लिंग: रामेश्वरम
लाभ: आर्थिक स्थैर्य, नोकरी-व्यवसायात वृद्धी आणि मानसिक शांतता.
वृषभ
ज्योतिर्लिंग: सोमनाथ
लाभ: आरोग्य सुधारणा, पारिवारिक सुख आणि शुभकार्यास यश.
मिथुन
ज्योतिर्लिंग: नागेश्वर
लाभ: आध्यात्मिक प्रगती, चिंतन आणि निर्णयक्षमता वृद्धिंगत.
कर्क
ज्योतिर्लिंग: ओंकारेश्वर
लाभ: आत्मज्ञान, मानसिक बळ आणि भावनिक स्थैर्य.
सिंह
ज्योतिर्लिंग: वैद्यनाथ
लाभ: आरोग्य सुधारणा, संतान सुख आणि राजकीय यश.
कन्या
ज्योतिर्लिंग: मल्लिकार्जुन
लाभ: विवाहयोग, कौटुंबिक सौख्य आणि शुभ फलप्राप्ती.
तूळ
ज्योतिर्लिंग: महाकालेश्वर
लाभ: भयमुक्ती, कालजयी मानसिक बळ आणि सक्षमता.
वृश्चिक
ज्योतिर्लिंग: घृष्णेश्वर
लाभ: विवाह, संतान आणि कौटुंबिक समाधान.
धनु
ज्योतिर्लिंग: काशी विश्वनाथ
लाभ: मोक्षप्राप्तीचा मार्ग, आध्यात्मिक उन्नती आणि धर्ममार्गावर स्थैर्य.
मकर
ज्योतिर्लिंग: भीमाशंकर
लाभ: मंगळदोष शांती, आत्मबळ आणि शारीरिक ऊर्जेची वृद्धी.
कुंभ
ज्योतिर्लिंग: केदारनाथ
लाभ: मोक्षदायक साधना, योगशक्ती आणि अंतर्मुखता.
मीन
ज्योतिर्लिंग: त्र्यंबकेश्वर
लाभ: सौख्य, समृद्धी, विलास आणि जीवनातील सौंदर्यप्राप्ती.