महाराष्ट्र

धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून घरजावई तरुणाने केली आत्महत्या;


मंगळवेढा/प्रतिनिधी:  मोहोळ तालुक्यातील जामगाव येथे एका घरजावई तरुणाने सासुरवाडीतच आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या भांडणांतून सतत होणाऱ्या छळास कंटाळून त्याने टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणी पत्नी, सासू, पत्नीचा प्रियकर व त्याच्या वडिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुणाचे वय ३४, रा. खुपसंगी, ता. मंगळवेढा असे आहे. या प्रकरणी त्याचे भाऊ यांनी कामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, हा तरुण पत्नीच्या आग्रहावरून सासुरवाडीत राहू लागले होते. त्यांनी आपल्या मूळ गावातील मालमत्ता विकून त्याचे पैसे सासुरवाडीत असलेल्या शेतीच्या विकासासाठी गुंतवले होते. काही काळ सर्व काही सुरळीत असतानाच, पत्नीचे तिच्याच नात्यातील एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला.

या तणावातून अनेकवेळा वाद, भांडण होत राहिले. विशेष म्हणजे, पत्नीच्या प्रियकराचे वडीलही त्याच शेतजमिनीत शेती करू लागले होते. यामुळे तरुणाला मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांनी यापूर्वी दोन वेळा स्थानिक पोलिसांकडे तक्रारही केली होती, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. शेवटी, पत्नी, सासू, प्रियकर आणि प्रियकराचे वडील यांनी केलेल्या मानसिक छळामुळे तरुणाने आत्महत्या केली. आरोप फिर्यादीत करण्यात आले आहेत. पोलिसांनी चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button