महाराष्ट्र

धक्कादायक! अभिनेत्रीच्या क्रूर कृत्याने हादरली मुंबई; मित्राची हत्या, ३०० तुकडे, मृतदेहासमोर बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध


मुंबई/प्रतिनिधी:  २००८ साली घडलेला एक थरकाप उडवणारा हत्याकांड आजही लोकांच्या स्मरणात धडकी भरवतो. कन्नड अभिनेत्री मारिया सुसाईराज आणि तिचा नौदल अधिकारी प्रियकर एमिल जेरोम मॅथ्यू यांनी मिळून मित्र नीरज ग्रोव्हरची निर्घृण हत्या केली आणि मृतदेहाचे सुमारे ३०० तुकडे करून जाळून टाकले. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती.

बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्याच्या प्रयत्नात असलेली मारिया मुंबईत आली असताना तिची ओळख नीरज ग्रोव्हरशी झाली. नीरज एका प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊसमध्ये कार्यरत होता. त्यांच्यातील वाढती जवळीक पाहून मारियाचा बॉयफ्रेंड एमिल जेरोमला संशय वाटू लागला.

एका दिवशी अचानक मुंबईतील मारियाच्या घरी पोहोचलेल्या जेरोमने नीरजला तिच्या बेडरूममध्ये पाहिलं. संतापाच्या भरात जेरोमने नीरजवर चाकूने सपासप वार करत त्याची जागीच हत्या केली.

या हत्येनंतर मारिया आणि जेरोमने मृतदेह घरात ठेवला आणि धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेहाजवळ असतानाही त्यांनी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं चौकशीत उघड झालं. नंतर त्यांनी मृतदेहाचे ३०० तुकडे करून प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरले आणि मुंबईच्या उपनगरातील जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळून टाकले.

नीरजच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्याच्या मित्रपरिवाराने पोलिसांकडे केली. चौकशीदरम्यान मारियाने एका चुकीच्या फोन कॉलमुळे पोलिसांच्या संशयाच्या जाळ्यात अडकली. तपास अधिक खोलवर गेल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणात न्यायालयाने मारिया सुसाईराजला तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तर एमिल जेरोम मॅथ्यूला दहा वर्षांचा कारावास ठोठावला. या निकालामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button