महाराष्ट्रशैक्षणिक

SSC Exam Paper Leak : दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या 

कॉपी प्रकरणाची गंभीर दखल शासन स्तरावर घेतली जाणार : शिक्षणमंत्री दादा भुसे


इन पब्लिक न्यूज : बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर दहावीच्या मराठी पेपरफुटीचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 21) उघडकीस आला. या घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शिक्षण अधिकारी मंगला धूपे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.

१५ मिनिटांतच पेपर बाहेर, उत्तरपत्रिका झेरॉक्सद्वारे पुरवली 

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर लीक झाल्याचे समोर आले. सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू होताच अवघ्या १५ मिनिटांतच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर आली. काही वेळातच शहरातील झेरॉक्स सेंटरमध्ये उत्तरपत्रिका छापून विद्यार्थ्यांना पुरवण्याचा प्रकार समोर आला. 

सांगोल्यातील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकाऱ्याकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?

या प्रकरणाची गंभीर दखल शासन स्तरावर घेतली जाणार : शिक्षणमंत्री दादा भुसे

या प्रकारावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणाची गंभीर दखल शासन स्तरावर घेतली जात असल्याचे सांगितले. ज्या केंद्रांवर यापूर्वीही कॉपीचे प्रकार घडले होते, ती केंद्रे रद्द करण्यात आली आहेत. तसेच अशा परीक्षा केंद्रांच्या व्यवस्थापनात बदल करण्यात येईल. पेपरफुटी आणि कॉपीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

बदनापूर पोलिसांची कारवाई : तिघांना अटक

शिक्षण मंडळाच्या आदेशानंतर जालना जिल्हा प्रशासनाने तत्काळ कारवाई करत तपास सुरू केला.  या प्रकरणात सीएससी केंद्र चालक, एका इंग्रजी शाळेतील कर्मचारी आणि तिसऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

या प्रकरणामुळे परीक्षा प्रणालीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यावर कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button