धक्कादायक! बिर्याणी खाताना घशात चिकनचे हाड अडकले, बॉयफ्रेंडसमोरच तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

पालघर / प्रतिनिधी: पालघर जिल्ह्यातील एका रेस्टॉरंटमध्ये २७ वर्षीय तरुणी बिर्याणी खाताना घशात चिकनचे हाड अडकून श्वास घेण्यास त्रास झाला. तिला त्रास होताना पाहून तिचा बॉयफ्रेंड तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही बिर्याणीचा आनंद घेत असताना अचानक हा प्रकार घडला. तरुणीचा घशात हाड अडकल्यामुळे श्वासोच्छवास थोडा बंद झाला आणि तिने बेशुद्ध होण्यास सुरुवात केली. रुग्णालयात डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि मृत्यूची नोंद केली.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास सुरु केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, की हा अपघात होता की काही अन्य कारण.पुढील तपास पोलिस करत आहेत.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983