“वय म्हणजे फक्त आकडा! शोभिता धूलिपालाचा ‘रोलिंग रोमॅन्स’, ‘गुपचूप’ सीन व्हायरल!”

मनोरंजन डेस्क : आजकाल OTT चा जमाना आहे. (Sobhita Dhulipala) इथे सर्व प्रकारचा कंटेंट सहज उपलब्ध आहे. जवळपास प्रत्येक वेब सिरीजमध्ये बोल्डनेसचा जबरदस्त तडका असतो. बोल्ड आणि धडाकेबाज अभिनेत्री आपल्या हटके अदा आणि धाडसी भूमिकांनी प्रेक्षकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण करतात. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आपण बोलणार आहोत, जिने एका वेब सिरीजमध्ये स्वतःपेक्षा तब्बल ३६ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देऊन सगळ्यांना थक्क केलं.
ही अभिनेत्री म्हणजे शोभिता धूलिपाला, जी साउथ सिनेमांपासून ते बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमठवत आहे. तिची वेब सिरीज ‘द नाईट मॅनेजर’ खूपच चर्चेत होती. यामध्ये तिने अनिल कपूर (जे तिच्यापेक्षा ३६ वर्षांनी मोठे आहेत!) यांच्यासोबत इंटीमेट सीन दिला होता. इतकंच नाही तर आदित्य रॉय कपूर याच्यासोबतही बोल्ड सीन्स पाहायला मिळाले.
शोभिता वेब सिरीजमध्ये अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड अवतारात दिसून आली आणि या भूमिकेमुळे तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये प्रचंड वाढ झाली. OTT प्लॅटफॉर्मवर तिने नवा बोल्ड ट्रेंड सेट केला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही!