शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार- आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला / प्रतिनिधी : लवकरच शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार असल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी काल मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत सदरची योजना चालू न झाल्यास ८२ गावे व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई उद्भवणार असून सध्या सांगोला तालुक्यात पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे असून सदरची योजना तातडीने कार्यान्वित करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना पटवून दिली.
सदरच्या प्रश्नाची गंभीरता लक्षातघेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना टंचाई निधी मधून ५.४१ कोटी इतकी थकबाकी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
या आदेशाची दखल घेत लवकरात लवकरनिधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.